शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 7 एप्रिल 2021 (13:56 IST)

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग व्हाट्सएप वापरत नाहीत! जाणून घ्या कोणता अॅप वापरतात ते

कोट्यवधी मोबाइल यूजर्स चॅटिंगसाठीव्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात, पण स्वतः व्हाट्सएपचा मालक मार्कझुकरबर्ग हे अॅप चॅटिंगसाठी वापरत नाही. अलीकडेच फेसबुकच्या 53 दशलक्ष ग्राहकांच्या डेटा लीक झाल्यानंतर हा खुलासा झाला आहे. अलीकडेच फेसबुकच्या 53 कोटी ग्राहकांच्या डेटा लीक झाल्याची घटना समोर आली आहे. यात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्कझुकरबर्ग यांचा डेटा लीक झाल्याच्या वृत्तामुळे लोकांमध्ये खळबळ उडाली होती. 
 
मीडिया रिपोर्टनुसार डेटा लीक प्रकरणात फेसबुकचा संस्थापक आणि व्हॉट्सअॅपचा मालक मार्क झुकरबर्ग सिग्नल अ‍ॅपवापरत असल्याचे समोर आले आहे. झुकरबर्गचा फोन नंबर 53 दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांच्या लीक झालेल्या डेटाचा असल्याचे समजते. मीडिया रिपोर्टनुसार मार्क झुकरबर्गचा फोन नंबर आणि फेसबुक यूजर आयडी व्यतिरिक्त त्याचे नाव, ठिकाण, लग्नाची माहिती आणि जन्मतारीख डेटाही लीक झाला आहे. 
 
एका सुरक्षा संशोधकाने खुलासा केला की झुकरबर्ग त्याच्या लीक झालेल्या फोन नंबरवरून सिग्नल वापरतात. सिग्नलचा वापर करूनमार्क झुकरबर्ग स्वत: च्या गोपनीयतेची काळजी घेत आहेत. सुरक्षा तज्ज्ञ डेव्ह वॉकर यांनी ट्विटरवर झुकरबर्गच्या लीक झालेल्या फोन नंबरचा स्क्रीनशॉट पोस्ट केला.त्यात मार्क झुकरबर्ग सिग्नलवर असल्याचे जोडले गेले. कारण फेसबुकमध्ये एंड-टू-एंडएन्क्रिप्शनची सुविधा नाही. तर झुकरबर्ग सिग्नल वापरून स्वत: च्या गोपनीयतेची काळजी घेत आहे.