testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एअरटेलची VoLTE सेवा वर्षाच्या अखेर लाँच

Last Modified मंगळवार, 11 जुलै 2017 (11:38 IST)

एअरटेलची व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्होल्यूशन

(VoLTE) सेवा या वर्षाच्या अखेरपर्यंत लाँच केली जाईल. सध्या पाच शहरांमध्ये या सेवेची चाचणी सुरु आहे, अशी माहिती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत-दक्षिण आशिया) गोपाल विठ्ठल यांनी दिली.
एअरटेलने नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पोस्टपेड ग्राहकांसाठी ‘प्रोजेक्ट नेक्स्ट’ या सेवेची सुरुवात केली. पोस्टपेड ग्राहक यावर्षी ऑगस्टपासून या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

पोस्टपेड ग्राहकांचा महिना संपल्यानंतर प्लॅनमधील उरलेला 3G किंवा 4G डेटा पुढच्या महिन्यात दिला जाईल. मात्र ग्राहकांना यासाठी एक अट असेल. तोच प्लॅन पुढेही चालू ठेवावा लागेल, जो अगोदरच्या महिन्यात चालू होता. अन्यथा डेटाची मुदतवाढ मिळणार नाही.यावर अधिक वाचा :