सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2019 (14:25 IST)

अमेझॅन समर सेल 2019: फक्त 499 रुपयांत 10000mAh च्या पॉवरबँक्स खरेदी करा

अमेझॅनवर सध्या समर सेल आयोजित करण्यात आली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप सारख्या बर्‍याच उत्पादनांवर प्रचंड सवलत मिळत आहे. अमेझॅनच्या या सेलमध्ये पावरबँक देखील फारच कमी किमतीत खरेदी करता येतील. या सेलमध्ये आपण 10000mAh चा पॉवरबँक्स 499 रुपयांच्या सुरुवाती किमतीवर खरेदी करू शकता. तर जाणून घेऊ सर्व ऑफरबद्दल...
 
* Ambrane P-1111 - आपण हे पॉवरबँक फक्त 499 रुपयांत घेऊ शकता. यावर एकूण 1,300 रुपयांची सवलत मिळत आहे. हे पॉवरबँक आपल्याला ब्लॅक, व्हाईट, गोल्ड आणि व्हाईट ब्ल्यू कलर वेरिएंटमध्ये मिळेल. यात दोन यूएसबी पोर्ट असतील.
 
* Micromax PBAPB1041GRB - मायक्रोमॅक्सच्या या पॉवर बँकवर 1,550 रुपयांची सवलत मिळत आहे. सवलत नंतर, हे पॉवर बँक केवळ 549 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. हे ग्रे आणि ब्लॅक कलर वेरिएंटमध्ये उपलब्ध असतील. त्याची क्षमता 10400 एमएएच आहे आणि यात दोन यूएसबी पोर्ट आहेत.
 
* Intex IT-PB11K - इंटेक्सचा हा पॉवरबँक 549 रुपयांमध्ये मिळत आहे. यावर एकूण 1,350 रुपयांची सवलत मिळत आहे. या पॉवरबँकमध्ये 11000 एमएएचची बॅटरी आहे आणि तीन यूएसबी पोर्ट आहे.
 
* Lenovo PA13000 - लेनोवोचा हा पॉवरबँक 2,700 रुपयांच्या सवलतीवर 799 रुपयांत मिळत आहे. हा पॉवरबँक व्हाईट, सिल्व्हर, गोल्ड व्हेरिएंटमध्ये दोन यूएसबी पोर्टसह मिळेल. यात 13000 एमएएच बॅटरी आहे.
 
* Lapguard LG514 - लॅपगार्डच्या या पॉवरबँकला 499 रुपयांत खरेदी करू शकता. यावर एकूण 1,801 रुपयांची सवलत मिळत आहे. यात 10400 एमएएच बॅटरी आहे आणि ट्रिपल यूएसबी पोर्ट आहे.
 
* Syska Power Go - सिस्काचा हा पॉवरबँक 1000 रुपयांच्या सूटसह 599 रुपयांत उपलब्ध आहे. हे पावरबँक व्हाईट आणि ब्लॅक कलर वेरिएंटमध्ये मिळेल. यात 10000 एमएएच बॅटरी आणि दोन यूएसबी पोर्ट देण्यात आले आहे.