शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 4 ऑक्टोबर 2018 (12:23 IST)

एअरटेलची जिओला टक्कर : 181 रुपयांत दुप्पट डेटा

रिलायन्स जिओला टक्का देण्यासाठी एअरटेल या मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीने ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी धमाकेदार ऑफर देऊ केली आहे. केवळ 181 रुपयांत रोज 3 जीबी डेटा मिळणार असून कॉलिंगही अनलिमिटेड करण्यात आले आहे.
 
टेलिकॉम टॉकनुसार एअरटेलच्या प्रिपेड ग्राहकांना 181 रुपयात प्रत्येक दिवशी 3 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलची सुविधा मिळणार  आहे. शिवाय 100 एसएमएसही मोफत असणार आहे. या पॅकची व्हॅलिडीटी 14 दिवसांची असणार आहे. म्हणजेच एकूण 42 जीबी डेटा मिळेल. यानुसार प्रति जीबीसाठी केवळ 4.3 रुपये मोजावे लागणार आहेत. तर व्हाइस कॉलसाठी कोणतेही बंधन नाही. हे पॅक काही ठरावीक सर्कलसाठी वैध राहणार आहेत.
 
किमतीच्या बाबतीत सध्या तीन जीबी एवढ्या कमी किमतीत देणारे कोणत्याही कंपनीचे रिचार्ज नाही. यामुळे जिओच्या 198 रुपयांच्या पॅकला टक्कर मिळणार आहे. जिओच्या या पॅकमध्ये प्रतिदिवशी 2 जीबी फोरजीडेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच व्हॅलिडिटी 28 दिवसांची मिळते. तर व्होडाफोनच्या 199 रुपयांच्या पॅकध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह अनिलिटिेड कॉल आणि केवळ 1.4 जीबी डेटा ळितो. यानंतर पैसे कापले जातात.