शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (19:26 IST)

रक्तदानासाठी फेसबुकचे नवे फिचर, रक्तदात्यांची फेसबुकवर नोंदणी

फेसबुकने समाजसेवेत मोलाचं पाऊल उचलत १ ऑक्टोबरपासून एक नवं फिचर आणलं आहे. या फिचरच्या माध्यमातून तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या रक्तदात्यांची माहिती तुम्हाला मिळणार आहे.
 
फेसबुक युजर्सच्या न्यूज फीडमध्ये एक मेसेज युजरला येईल. त्यामाध्यमातून रक्तदात्यांना फेसबुकवर नोंदणी करता येईल. जर तुम्ही यापूर्वी रक्तदान केलं असेल तर तुम्ही फेसबुकवर नोंदणी करू शकता. तुमची माहिती फेसबुक गुप्त ठेवील किंवा तुम्ही ती माहिती आपल्या टाईमलाईनवर देखील शेअर करु शकता. जर एखाद्याला रक्ताची गरज असेल तर फेसबुकवर नोंदणी केलेल्या प्रत्येक रक्तदात्याला एक नोटीफिकेशन येईल. याद्वारे गरजूंना रक्तदात्यांशी थेट संपर्क साधता येणार आहे. फेसबुकच्या या नव्या उपक्रमाचे सर्वांकडून स्वागत होताना दिसत आहे.