सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑगस्ट 2019 (17:00 IST)

Facebook आणत आहे नवीन अॅप, स्नॅपचँटशी होईल मुकाबला

facebook-to-launch-new-app-to-compete-snapchat
जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी Facebook लवकरच एक नवीन मोबाइल अॅप लाँच करणार आहे. वृत्तानुसार फेसबुकच्या या नवीन अॅपचा सामना Snapchat शी होणार आहे. फेसबुकच्या या अॅपला Threads नावाने ओळखण्यात येईल. या अॅपला सुरुवातीत इंस्टाग्रामसोबत सादर करण्यात येऊ शकते.  
 
थ्रेड अॅपच्या माध्यमाने इंस्टाग्राम यूजर्स आपल्या जवळचे मित्र (क्लोज फ्रेंड)सोबत आपली लाइव्ह लोकेशन, गाडीची स्पीड आणि बॅटरी लाईफ शेयर करू शकतील. तसेच यासाठी ते आपल्या मित्रांना इनवाइट देखील करू शकतील.  
 
फेसबुक सध्या या अॅपची टेस्टिंग करत आहे आणि याचा वापर इंस्टाग्रामसोबत क्लोज फ़्रेंडसाठी होईल. तसे तर फेसबुकने या अॅपबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नसून मीडिया रिपोर्ट्समध्ये देखील या अॅपच्या लाँचिंगची तारीख देण्यात आलेली नाही आहे.