मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फ्लिपकार्टचा सुरक्षा प्लान लाँच, करा मोफत रिपेअरींग

फ्लिपकार्टने संकेतस्थळावरुन नवीन मोबाइल खरेदी करणाऱ्यांसाठी एक नवा मोबाइल प्रोटेक्शन प्लान अर्थात सुरक्षा प्लान लाँच केला आहे. या प्लानच्या अंतर्गत ग्राहकांना अधिकृत ब्रँडचे फोन मोफत रिपेअर किंवा बदलून मिळेल. 99 रुपयांपासून या प्लानची सुरूवात असून CMP म्हणजेच ‘कंप्लीट मोबाइल प्रोटेक्शन’ असं याचं नाव आहे. या प्लानमध्ये फोनच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसंबंधी तसंच ब्रेकेज आणि लिक्विड डॅमेजच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत.
 
या प्लानचा लाभ शाओमी, ओप्पो, पोको, रिअलमी, ओप्पो, सॅमसंग, अॅपल, ऑनर, आसुस, इंफिनिक्स आणि अन्य अनेक ब्रँड्ससह मिळेल. नवा स्मार्टफोन खरेदी करताना हा प्लान घेता येईल. फोनची डिलिव्हरी होताच हा प्लान सक्रिय होईल आणि एक वर्षापर्यंत वैधता असणार आहे. या इन्शुरन्सवर दावा ठोकण्यासाठी 1800 425 365 365 या क्रमांकावर कॉल करुन पॉलिसी आयडी शेअर करावी लागेल. जर स्क्रीन तुटली असेल किंवा पाण्यामुळे फोन खराब झाला असेल तर  इमेल आयडीवर एक लिंक पाठवली जाईल. यासाठी 500 रुपये प्रोसेसिंग फी द्यावी लागेल. फी भरल्यानंतर फोनसाठी पिक अप आणि ड्रॉपची सेवा दिली जाईल, पहिल्यांदा या सेवेचा वापर करणाऱ्यांसाठी ‘पिक अप’ आणि ‘ड्रॉप’ मोफत मिळेल. पॉलिसीनुसार केवळ एकदाच डॅमेज स्क्रीन किंवा लिक्विड डॅमेजसाठी दावा ठोकू शकता. दुरूस्तीसाठी दिलेला फोन 10 दिवसांच्या आत  परत दिला जाईल. जर 10 दिवसांमध्ये फोन परत मिळाला नाही तर फ्लिपकार्टकडून 500 रुपयांचं गिफ्ट व्हाउचर मिळणार आहे.