1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फेसबुक बंद करत आहे सर्वात खास फीचर, अनेक लोकं होताय नाराज

facebook feature
फेसबुकने टेस्टिंग म्हणून लाइक्सची संख्या लपवणे सुरू केले आहे. सध्या याची टेस्टिंग ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे. या निर्णयावर फेसबुकचे म्हणणे आहे की जगभरात वाढत असलेल्या सामाजिक दबावाला कमी करण्याच्या उद्देश्याने पायलटिंग सुरू आहे.
 
फेसबुकच्या या पाउलामुळे यूजर्स फेसबुकवर लाइक, पोस्ट वर प्रतिसाद बघू शकणार नाही. फेसबुकवर कोणत्याही प्रकाराची स्पर्धा जाणवू नाही म्हणून हा निर्णय घेण्यात येत असल्याचे फेसबुकने सांगितले.
 
लोकं फेसबुकवर कोणताही फोटो किंवा प्रोफाइल पिक्चर अपलोड केल्यावर त्यावर येणारे लाइक्स बघून खूश होतात. कोणाला आपले फोटो पसंत पडले आहे हे बघून आनंद होतो. पण अनेकदा कमी प्रमाणात लाइक्स बघून लोकं निराश देखील होतात. म्हणूनच फेसबुक हे फीचर बंद करणार आहे. 
 
तरी हे फीचर कधी जारी होणार याबद्दल माहिती दिलेली नाही. हे फीचर आल्यावर कोणत्या पोस्टवर किती लाइक्स आले हे दिसणार नाही.
 
उल्लेखनीय आहे की लाइक काउंट हाईंड करण्याचं फीचर इंस्टाग्रामवर काही महिन्यापूर्वीच जारी झाले आहे. हेच फीचर आता कंपनी फेसबुकवर अमलात आणू बघत आहे. तरी इंस्टाग्रामवर लाइक काउंट हाईंड फीचर सध्या भारतात लाइव्ह झालेले नाही.