testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

घ्या, आता स्मशानातही मोफत वाय-फाय

Cremations at Pashupatinath Temple
मोफत वाय-फाय असलेल्या जागांमध्ये आणखी एका जागेची भर पडली असून स्मशानातही ही सुविधा मिळण्याची सुरूवात झाली आहे. चेन्नईतील एका स्मशानात ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
चेन्नईच्या अण्णानगर, न्यू आवडी रोड येथे असलेल्या वेलंगाडू स्मशानात मोफत वाय-फाय सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. इंडियन कम्युनियी वेल्फेअर ऑर्गनायझेशन, चेन्नई, ग्रेटर चेन्नई कॉपोरेशन आणि रोटरी क्लब ऑफ मिनम्बाक्कम या संस्था संघटनांनी मिळून हा उपक्रम सुरू केला आहे. येथे मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे मृत व्यक्तीच्या परदेशात स्थायिक झालेल्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारांचे थेट प्रक्षेपण पाहणे शक्य होईल, अशी अपेक्षा या संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी माध्यमांजवळ व्यक्त केली.
ज्यांना अंत्यसंस्कारांसाठी उ‍पस्थित राहता येत नाही त्यांच्यासाठीही या सुविधेचा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :