गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 8 एप्रिल 2019 (17:23 IST)

बेरोजगार तरुणांसाठी चांगली बातमी

ई-कॉमर्स कंपनी पेटीएम मॉलची योजना पुढील काही महिन्यांत 300 लोकांना नोकर्‍या देण्याची आहे. हे कंपनीच्या अलीकडे नियुक्त केलेल्या 200 लोकांपेक्षा वेगळं असेल. चीनच्या अलीबाबाशी वित्त पोषित पेटीएम मॉल देशाची सर्वात वेगवान ऑनलाइन टू ऑफलाइन (ओ2ओ) कंपनी आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये कंपनीचा ओ2ओ व्यवसाय 200 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दराने वाढत आहे.
 
पेटीएम मॉलचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीनिवास मोथे म्हणाले की ओ2ओ व्यवसायात आम्हाला मजबूत वाढ होण्याची आशा आहे. ही वाढ टिकवून ठेवण्यासाठी आम्ही आमच्या काही कर्मचारी गटांना पुनर्गठित केले आहे आणि 200 पेक्षा जास्त लोकांना आपल्या व्यवसायाशी जोडले आहे. ते म्हणाले की येत्या काही महिन्यांमध्ये त्यांची योजना आणखी 300 लोकांना नोकरी देण्याची आहे. हे व्यवसाय, तंत्रज्ञान आणि उत्पादन श्रेणीमध्ये होईल.