शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By

आता इमोजी मर्ज करुन नवीन इमोजी बनवा

स्मार्टफोन वापरणारा जवळपास प्रत्येक युजर रोजच्या जीवनात कधीतरी इमोजीचा वापर करतो. अशाच सतत इमोजी वापरणाऱ्या युजर्ससाठी गुगलने एक नवं फीचर आणले आहे. गुगल जी-बोर्डसाठी कंपनीने एक नवीन फीचर रोल आउट करायला सुरूवात केलीये. या फीचरला इमोजी किचन (Emoji Kitchen)असे नाव देण्यात आले आहे.
 
Emoji Kitchen या फीचरद्वारे आवडीचे इमोजी ‘कस्टमाइज’ करु शकतात. या फीचरद्वारे  आवडीचे इमोजी मर्ज करुन नवीन इमोजी बनवू शकतात. गुगलने हे फीचर रोलआऊट करण्यास सुरूवात केलीये. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला प्ले-स्टोअरमध्ये जाऊन गुगल जीबोर्ड अॅप अपडेट करावं लागेल.