testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गुगलने हेरगिरी करणारे 20 अॅप्लिकेशन्स हटवले

google
Last Modified शुक्रवार, 28 जुलै 2017 (17:13 IST)

गुगलकडून प्ले स्टोअरवर असलेले 20 अॅप्लिकेशन्स हटवण्यात आले आहेत. हे अॅप्लिकेशन्स युझर्सची हेरगिरी करताना आढळल्याने प्ले स्टोअरवरून डिलीट करण्यात आले आहेत. युझर्सचे

ई-मेल, टेक्स्ट मेसेज, व्हॉइस कॉल्स, लोकेशन आदी गोष्टींवर हे अॅप्स नजर ठेवून असायचे त्यामुळे ते डिलीट करण्यात आल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं आहे. या 20 अॅप्सचे डेव्हलपर्स आणि अॅप्सला अॅन्ड्रॉइड ईकोससिस्टीमद्वारे ब्लॉक करण्यात आलं
आहे.

या अॅप्समध्ये लिपिज्जा नावाचा एक स्पायवेअर होता. हा स्पायवेअर जुनं अॅंड्रॉइड व्हर्जन असलेल्या फोनचं सिक्युरिटी प्रोटेक्शन तोडायचा. त्यानंतर युझर्सची खासगी व संवेदनशील माहिती गोळा केली जायची. हे अॅप्स जीमेल, हॅंगआउट, मेसेंजर यासारख्या अॅप्समधून माहिती गोळा करत होते. याशिवाय व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि व्हायबर यासारख्या अॅप्सच्या मेसेजवरही लक्ष ठेवलं जायचं.यावर अधिक वाचा :