Widgets Magazine

झोमॅटो हॅक, 1 कोटी 70 लाख यूझर्सचा डेटा चोरीला गेल्याची भीती

Last Modified गुरूवार, 18 मे 2017 (22:54 IST)

भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन रेस्टॉरंट गाईड असलेले झोमॅटो हॅक झाले आहे. जवळपास 1 कोटी 70 लाख यूझर्सचा डेटा चोरीला गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. झोमॅटो वेबसाईटवर सुमारे 12 कोटी यूझर्स आहेत. एनक्‍ले या ऑनलाईन हॅंडल यूझरने हा डेटा हॅक केल्याचा दावा केला आहे. 1.7 कोटी यूझर्सचा डेटा विकल्याचा धक्कादायक दावाही त्याने केला आहे. झोमॅटोकडूनही हे ऑनलाईन चोरी घडल्याची कबुली देण्यात आली आहे. दरम्यान, ईमेल आयडी आणि हॅश च्या माध्यमातील पासवर्ड चोरीला गेले असून, ते हॅकरला मिळवता येणार नाहीत, असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे यूझर्सचा डेटा सुरक्षित असल्याचे झोमॅटोचे म्हणणे आहे.

पेमेंटशी निगडीत माहिती इतरत्र साठवली असून क्रेडिट कार्ड डेटा किंवा तत्सम माहिती चोरीला गेली नसल्याचे झोमॅटोने म्हटलं आहे.यावर अधिक वाचा :