बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

काय Whatsapp वर सुरक्षित आहे आपला डेटा?

फेसबुकवर डेटा लीकची बातमी पसरल्यावर सोशल मेसेजिंग अॅप व्हाट्‍सअॅपची विश्वसनीयतेवर प्रश्न उठू लागले आहे. व्हाट्‍सअॅपने त्या रिपोर्ट्स नाकारल्या आहेत ज्यात कंपनी वैयक्तिक माहिती ट्रॅक करण्याचा उल्लेख आहे. उल्लेखनीय आहे की व्हाट्‍सअॅप देखील फेसबुकच्या मालकीची कंपनी आहे.
 
व्हाट्‍सअॅपप्रमाणे ते केवळ थोडीशी माहिती एकत्र करतात आणि प्रत्येक मेसेज ऍड-टू-ऍड एनक्रिप्टेड होत असतो. विशेषज्ञांनी अॅपच्या सुरक्षेवर प्रश्न उचलत असताना व्हाट्‍सअॅपकडून हे उत्तर देण्यात आले आहे.
 
व्हाट्‍सअॅपच्या एका प्रवक्त्याने म्हटले की व्हाट्‍सअॅप मर्यादित प्रमाणात डेटा गोळा करतो आणि प्लॅटफॉर्मवर शेअर केलेले सर्व मेसेज एनक्रिप्टेड होतात. मीडियामध्ये आलेल्या टिप्पण्या विरुद्ध, आम्ही मित्र आणि नातेवाइकांना आपल्याद्वारे पाठवलेले मेसेज ट्रॅक करत नसतो.
 
प्रवक्त्याने म्हटले की वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षा हे व्हाट्सअॅपसाठी अविश्वसनीय रूपाने महत्त्वाचे आहे.
 
काय आहे तज्ज्ञांचे मत :
व्हाट्सअॅपच्या सुरक्षा फीचरबद्दल तज्ज्ञांचे म्हटले आहे की कंपनीद्वारे केला जात असलेला दावा पुख्ता नाही. व्हाट्‍सअॅपचे भारतात 20 कोटी यूजर्स आहे. तज्ज्ञांनी यूजर्स कराराच्या काही प्रावधानांवर प्रश्न उचलले आहेत, जिथे चुकीचे काम कळण्यात येत नाही आणि किंवा त्यांना कोणी आव्हान देत नाही. दुनियेत व्हाट्सअॅपचे एक अब्ज यूजर्स आहे भारतात हे एक लोकप्रिय सोशल मेसेजिंग अॅप आहे. 2014 मध्ये फेसबुकने याचे अधिग्रहण केले होते.