testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मोबाइलच्या खराब नेटवर्कुळे हैराण असाल तर करा हे उपाय!

Last Modified बुधवार, 3 ऑक्टोबर 2018 (13:01 IST)
अनेकजण नेहमीच स्मार्टफोनच्या खराब सिग्नलमुळे हैराण असतात. खराब सिग्नलमुळे कॉल ड्रॉप होणे, इंटरनेटची स्पीड कमी होणे, आवाज नीट न येणे, मेसेज सेंड न होणे आणि ई-मेल न येणे यांसारख्या समस्या होतात. अनेकदा महत्त्वाच्या कामावेळी सिग्नल न मिळत असल्याने अनेकजण फस्ट्रेशनमध्ये जातात. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुमच्या मोबाइलचे सिग्नल आणखी मजबूत होतील.

फोन कव्हर दूर करा
स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी कव्हर वापरणे योग्य आहे. पण याने सिग्नल पकडण्याची स्पीड प्रभावित होते. जेव्हा तुमच्या मोबाइलचं कव्हर खूप जाड असतं. त्यासोबतच फोन पकडताना अशी काळजी घ्या की, हँडसेटचा एंटीना बँड्‌स ब्लॉक होऊ नये.

स्मार्टफोन आणि सेल टॉवरमधील अडथळा दूर करा
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, तुम्ही कशाप्रकारे सेलफोन आणि सेल टॉवर्समधील अडथळा दूर करु शकता. तुमच्या फोनला सेल टॉवरमधून सतत सिग्नल मिळत असतात आणि टॉवर्समधून येणारे सिग्नल्स अनेक अडथळे दूर करत येतात. पण फोनपर्यंत पोहोचेपर्यंत ते कमजोर होतात. त्यामुळे खिडकीत किंवा खुल्या जागेत या. मेटल किंवा काँक्रिटच्या भींतीपासून दूर राहा. फोन इलेक्ट्रॉनिक उपकरणापासून दूर ठेवा.
सिम कार्ड चेक करा
अनेकदा अचानक सिग्नल जातात. सिम कार्डवर धूळ असल्याने किंवा काही तांत्रिक बिघाडामुळेही होऊ शकतं. सिग्नलची मजबुती यावर निर्भर असते की, तुम्ही कोणत्या सिम कार्डचा वापर करत आहात. योग्य ती काळजी न घेतल्याने फोनमध्ये धूळ जाते. सिग्नल खराब झाले असताना सिम कार्ड बाहेर काढा, स्वच्छ करा आणि पुन्हा फोनमध्ये लावा. असे केल्याने सिग्नल मजबूत होण्यास मदत मिळेल. असे न झाल्यास सिम कार्ड रिप्लेस करु शकता. कदाचित सिम कार्ड डॅमेज झालं असावं.

योग्य ऑपरेटरची निवड
नेहमी समस्या फोनची नसते. अनेकदा ऑपरेटरचीही समस्या असते. जिथे तुम्ही राहता किंवा काम करता तिथेच नेटवर्क खराब असेल तर हे समजून जावे की, नेटवर्कमध्येच समस्या आहे. त्याच ऑपरेटरी सेवा वापरणार्‍या दुसर्‍या व्यक्तीलाही हीच समस्या येत असेल तर तुम्हाला नवीन नेटवर्क प्रोव्हायडर निवडण्याची गरज आहे. तुम्ही राहता त्या परिसरात ज्यांचं नेटवर्क चांगलं आहे त्यांची सेवा घ्या.

फोनची बॅटरी सेव्ह करा
कधीकधी फोन सिग्नल सर्च करण्यासाठी जास्त बॅटरी खर्च होते. बॅटरी कमी असेल तर सिग्नल मिळण्यासही अडचण होऊ शकते. अशावेळी फोनची बॅटरी कमी असेल तर काही अ‍ॅप्स, वाय-फाय आणि इतर कनेक्टिव्हीटी ऑप्शन्स बंद करायला हवेत.

ऑफ करा ऑन करा
कधी कधी फोन ऑफ करुन ऑन केल्यासही समस्या सुटू शकते. यासाठी कारण फोन ऑन झाल्यावर नव्याने तेच नेटवर्क शोधतं आणि त्याच टॉवरसोबत कनेक्ट होतं, ज्याचं सिग्नल स्ट्राँग आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

सुप्रिया सुळे लोकसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदी ...

national news
शरद पवार यांचा राजकीय वारस कोण असेल हे अजिन तरी स्वतः शरद पवार यांनी दाखवून दिले नाही. ...

शिवसेनेची भाजपवर टीका : भाजप मुक्त भारत होतेय कॉंग्रेस ...

national news
भाजपा मित्र पक्ष शिवसनेने भाजपवर जोरदार टीका केली आहे. जे हवेत उडत होते त्यांना जमिनीवर ...

देशातील सर्वात मोठ्या एस.बी.आय. बँकेने केली ही सुविधा, होईल ...

national news
देशातील सर्वात मोठी बँक म्हणवून घेत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं पुन्हा ग्राहकांना मोठा ...

अँड्रॉइड स्मार्टफोनचे 30 गुप्त कोड

national news
गूगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. हे जगातील ...

तेलंगणात टीआरएसची सत्ता

national news
देशाच्या राजकारणाची पुढील दिशा आणि आगामी लोकसभा निवडणुकीतील जनतेचा कल याविषयी संकेत ...