सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 1 एप्रिल 2021 (14:04 IST)

मुलांच्या सुरक्षेसाठी इंस्टाग्रामचं नवीन फीचर

सोशल मीडिया प्लेटफार्म आता मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आलप्या अॅपमध्ये नवीन फीचर जोडत आहे. विशेष करुन मुलांना लक्षात ठेवून हे फीचर तयार केलं गेलं आहे. या अंतर्गत आता कमी वयाचे मुलं आपलं इंस्टाग्राम अकाउंट उघडू शकणार नाही. सोबतच अनओळखी व्यस्क वापरकर्ता मुलांच्या संपर्कात येऊ शकणार नाही.
 
हे तरुण इंस्टाग्राम वापरकर्ते शोधण्यासाठी इंस्टाग्राम कृत्रिम बुद्धिमत्ता Ü आर्टिफिशियल इंटेलिजेंस वारपरेल. याच्या मदतीने तरुण वापरकर्त्यांनी साइन अप करताच कंपनीला कळेल.
 
कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की सोशल मीडिया प्लेटफार्मवर आपलं अकाउंट उघण्यासाठी अनेक आपलं वयं खोटं सांगतात, विशेष करुन लहान मुलं असे काम अधिक प्रमाणात करतात. यावर ताबा घालण्यासाठी एक पाऊल उचलण्यात येत आहे व एक नवीन फीचर रोलआउट करण्यात येत आहे.
 
आर्टिफिशियल इंटेलिजेंस व मशीन लर्निंग याच्या वापर करुन तयार करण्यात येत असलेल्या या टॅक्निद्वारे हे थांवबता येईल. या व्यतिरिक्त कंपनीच्या नवीन वैशिष्ट्याने अनओळखी व्यस्क 18 वर्षांहून लहान वापरकर्त्यांना मेसेज देखील पाठवू शकणार नाही. नवीन फीचर व्यस्करांना सजेस्ट यूजर्समध्ये कमी वयाच्या मुलांचे अकाउंट दाखवण्यास प्रतिबंध लावेल.