Widgets Magazine

रिजार्च केले नाही, तरी सुरू आहे जियोची फ्री सेवा

15 एप्रिलपर्यंत रिचार्ज करवले नाही तर जियोची फ्री सेवा बंद होईल, अशी घोषणा रिलायन्सने केली होती तरी फ्री सेवा बंद झालेली नाही. अजूनही त्या लोकांची ‍जियो सिम काम करत आहे ज्यांनी कुठलेही प्लान घेतलेले नाही. रिचार्ज करवले नाही तरी कॉलिंग आणि इंटरनेट वापरण्याची संख्या कमी नाही.
काय जियोने आपल्या फ्री सर्व्हिसची तारीख पुन्हा वाढवली की काय असा प्रश्न अनेक लोकांच्या मनात येत असला तरी कंपनीने याबद्दल कुठलीही घोषणा केलेली नाही. परंतू कंपनी आपल्या ग्राहकांना थोडा वेळ देऊ इच्छित असावी म्हणून रिचार्ज न करवण्यार्‍यांची सिम सध्या सुरूच आहे.

पण यामुळे रिचार्ज करवणारे गोंधळले आहे. त्यांना आपण पैसे का म्हणून खर्च केले असे वाटतं आहे. कारण अजूनही कंपनी मोफत सेवा देत आहे. तरी कंपनी अश्या ग्राहकांना रिचार्ज करून घ्यावे असा संदेश निरंतर पाठवत आहे.


यावर अधिक वाचा :