बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

कॅशबॅकच्या माध्यमातून जिओ प्राइम मेंबरशिप

रिलायन्स जिओची फ्री ऑफर 31 मार्चनंतर बंद होणार आहे. 1 एप्रिलपासून जिओ आपली सेवा देण्यासाठी यूजर्सकडून शुल्क आकारणार आहे. प्राइम मेंबरशिपसाठी यूर्जसला 99 रूपये द्यावे लागणार आहे. पण आता कंपनीनं आपल्या यूजर्सला एक नवी भेट दिली आहे. आता जिओ यूजर्सला मोफत सब्सक्रिप्शन मिळू शकतं. रिलायन्स जिओच्या जिओ मनी अॅपच्या ऑफरमध्ये तुम्हाला हा फायदा मिळणार आहे.
 
जिओने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून याबाबत माहिती दिली आहे. जिओ मनीवरून रिचार्ज केल्यास यूजर्सला प्रत्येक रिचार्जवर 50 रूपये कॅशबॅक मिळेल. तर प्राइम मेंबरशिपसाठी यूजर्सला 99 रूपये सब्सक्रिप्शन फी आणि 303 रूपये दर महिना शुल्क द्यावं लागेल. जर यूजर्स 99 रूपये मेंबरशिप आणि 303 रूपयाचं टेरिफ रिचार्ज केलं तर या दोन रिचार्जवर असं 100 रूपयाचं कॅशबॅक मिळेल. म्हणजेच तुमचे 100 रूपये तुम्हाला परत मिळणार आहे. म्हणजे ऑफर असल्याने तुम्हाला पहिले रिचार्ज करावं लागेल. त्यानंतर दोन दिवसात तुम्हाला कॅशबॅक मिळेल. कंपनीची ही ऑफर यूजर्ससाठी चागंलं डिल ठरू शकतं.