testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

निर्मला सीतारामन यांच्याविषयी गुगलवर सर्वाधिक सर्च

Nirmala Sitharaman
यांची देशाच्या पूर्णवेळ संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती झाली. रविवारी त्यांनी नव्या पदाची शपथ घेतल्यानंतर विविध क्षेत्रातून याविषयी उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. महिलेला इतके महत्त्वाचे आणि आव्हानात्मक खाते दिल्यामुळे याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. इंदिरा गांधी यांच्यानंतर देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिला मंत्र्याच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर निर्मला सीतारामन यांचे नाव संरक्षणमंत्री म्हणून जाहीर झाले. त्यानंतर गुगल इंडियावर त्यांना सर्वाधिक सर्च करण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबाबत असलेली उत्सुकता यामधून दिसून येते.

यामध्ये त्यांची पार्श्वभूमी, शिक्षण, त्यांनी केलेले काम याबाबत जाणून घेण्यात नेटिझन्सना रस असल्याचे दिसून आले. उत्तर कोरियाने हायड्रोजन बाँबची चाचणी केली. त्यामुळे उत्तर कोरिया आणि निर्मला सीतारामन सर्चमध्ये अव्वल होते. एखादी महत्त्वाची घटना घडली की त्याबाबत गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केला जातो. त्यानुसार सीतारामन यांच्याबाबत सर्चिगचा ट्रेंड सर्वाधिक असल्याचे दिसून आले.


यावर अधिक वाचा :