शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जून 2019 (16:44 IST)

या स्मार्टफोनवर नाही चालणार WhatsApp

जगातील सर्वात मोठी इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp ने पुन्हा एकदा काही फोन्समध्ये सपोर्ट बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या वक्तव्यानुसार 1 फेब्रुवारी 2020 पासून Android version 2.3.7 असणारे स्मार्टफोन आणि iOS 7 आयफोनवर व्हाट्सअॅप काम करणार नाही. त्याच वेळी कंपनीने असे म्हटले आहे की या निर्णयाचा प्रभाव अधिक वापरकर्त्यांना प्रभावित करणार नाही, कारण की अधिकतर वापरकर्त्यांकडे नवीन फोन असतो. कंपनीने एका वक्तव्यात हे देखील म्हटले आहे की Android KitKat अर्थात 4.0.3 व्हर्जन किंवा त्याच्या वरील व्हर्जन असलेले स्मार्टफोनमध्ये WhatsApp सपोर्ट मिळेल, परंतु यापेक्षा कमी व्हर्जन असलेले स्मार्टफोन वापरकर्ते व्हाट्सअॅप वापरण्यास सक्षम राहणार नाहीत.
 
* 31 डिसेंबरनंतर Windows Phone मध्ये नाही चालणार WhatsApp
 
आपण सध्या विंडोज फोनमध्ये व्हाट्सअॅप वापरत असल्यास तर आपल्यासाठी एक वाईट बातमी आहे. व्हाट्सअॅपने जाहीर केलं आहे की या वर्षाच्या अखेरीस सर्व विंडोज फोनमध्ये व्हाट्सअॅप सपोर्ट बंद होईल. अधिकृत माहितीनुसार 31 डिसेंबर 2019 नंतर व्हाट्सअॅप कोणत्याही विंडोज फोनमध्ये काम करणार नाही. यापूर्वी कंपनीने Nokia Symbian S60 मध्ये 30 जून 2017, Blackberry OS आणि Blackberry 10 मध्ये 31 डिसेंबर 2017, Nokia S40 मध्ये 31 डिसेंबर 2018 नंतर सपोर्ट थांबवले आहे. 
 
तरी असे नाही आहे की या फोन्समध्ये सपोर्ट बंद झाल्यानंतर व्हाट्सअॅप चालणार नाही. आपण सपोर्ट बंद केल्यानंतरही व्हाट्सअॅप वापरू शकाल पण जर काही बग आला, तर कंपनी त्याच्या निराकरणासाठी अपडेट जारी करणार नाही. यासह आपल्याला कोणताही नवीन अपडेट देखील मिळणार नाही.