शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

Facebook तुमच्या घरी पोहोचवेल अन्न, partnership with this company

फेसबुकचे सीईओ मार्क जुकरबर्ग कुठल्याही किमतीत आपल्या फेसबुक यूजर्सला फेसबुकवरून दूर जाऊ देणार नाही, त्यासाठी ते रोज नवीन नवीन फीचर लॉन्च करत आहे. फेसबुकच्या माध्यमाने नोकरी शोधण्याचे ऑप्शन दिल्यानंतर आता त्यांनी फूड डिलीवरीसाठी ऑर्डर फूड फीचर लॉन्च केले आहे.  
 
फूड डिलीवरीसाठी फेसबुकने Delivery.com आणि स्लाइसशी अमेरिकेत पार्टनरशिप केली आहे. फूड ऑर्डर फीचरच्या मदतीने फेसबुक यूजर्स पार्टनरशिप असणार्‍या रेस्टोरेंटमधून फूड ऑर्डर करू शकतील. हे फीचर फेसबुकच्या मोबाइल एप आणि डेस्कटॉप दोघांसाठी आहे. फूड ऑर्डर करण्याचे ऑप्शन नेविगेशन मीनू (सर्च बार)मध्ये मिळेल. ज्यात एड टू कार्ट, एडिट ऑर्डर आणि पेमेंटचे ऑप्शन असेल.  
 
पेमेंट केल्यानंतर तुमच्या फेसबुक स्क्रीनवर ऑर्डरचे कन्फर्मेशन मिळेल. तसेच डिलीवरीची वेळ देखील तुम्हाला मिळेल. त्याशिवाय यूजर्सची इ-मेल आयडीवर देखील ऑर्डरचे मेल कंनफर्मेशन मिळेल. अद्याप हे अजून स्पष्ट नाही आहे की फेसबुक या फीचरला अमेरिकेनंतर कोण कोणत्या देशांसाठी लाँच करतो आणि केव्हापर्यंत लाँच करतो.