1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (11:31 IST)

आता BookMyShow वर बघा मूव्ही

BookMyShow वरुन आपण अनेकदा ऑनलाईन मूव्ही तिकीट बुक केलं असेल पण आता या प्लॅटफॉर्म वर स्ट्रीम सर्व्हिस सुरू झाली आहे. बुक माय शो ने आपली नवी स्ट्रीम सर्व्हिस सुरू केली असून आता या App वर युजर्सला ऑनलाईन मूव्हीदेखील पाहता येणार आहे. 
 
कंपनी युजर्सला या प्लॅटफॉर्मवर 600 हून अधिक चित्रपट आणि 72000 हून अधिक तासांचा कंटेंट देत आहे. या स्ट्रीम सर्व्हिसमध्ये जगभरातील चित्रपट आणि कंटेंटची एक लायब्ररी असणार आहे. यात 22 हजारहून अधिक तासांचा कंटेंट एक्सक्यूसिव असेल.
 
BookMyShow स्ट्रीममध्ये प्रत्येक शुक्रवारी अनेक प्रीमियर होतील. त्याशिवाय युजर्स मूव्ही रेंट आणि सब्सक्रिप्शनवरही घेऊ शकतात. यासाठी आपल्या आपल्या आवडीप्रमाणे 40 ते 700 रुपयांपर्यंत खर्च करावा लागू शकतो.
 
माहितीनुसार बुक माय शो चित्रपटांचा प्रीमियर, एक्सक्यूसिव, वर्ल्ड सिनेमा, मिस्ड इन थिएटर्स, फेस्टिव्हल फेव्हरेट आणि डेडिकेटेड बंडल्ससारख्या कॅटेगरी अंतर्गत लक्ष केंद्रीत करेल. येथे थिएटर्समध्ये मिस केलेले चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. सोनी पिक्चर्स, वार्नर ब्रदर्स आणि युनिवर्सल पिक्चर्ससह ग्लोबल प्रोड्यूसर्स यांच्या भागीदारीसह हॉलिवूडचा कंटेंट सादर करण्यात येईल.