शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 5 मे 2018 (09:29 IST)

आता ओप्पोचा मोबाईल अचानक पेटला

वसईत मोबाईलचा स्फोट झाला आहे, मोबाईलचा स्फोट कशामुळे झाला हे समजू शकलेलं नाही. वसईतील दिनानाथ दूबे यांच्या ओप्पोच्या मोबाईलनं अचानक पेट घेतला. मोबाईल चार्जिंगला लावला असताना आधी त्यातून धूर आला आणि त्यानंतर मोबाईलनं पेट घेतला. हा मोबाईल घेऊन अवघं एक वर्ष झालं होतं. आणि मोबाईलमध्ये कोणताच बिघाडही झाला नव्हता. नशिबानं हा मोबाईल कोणी हाताळत नव्हते.  अन्यथा कोणीतरी यामुळे निश्चितच जखमी झालं असतं. मात्र सुदैवाने असं काही झालं नाही.