बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मे 2018 (15:23 IST)

लग्न होत नाही युवकाने केली आत्महत्या

सातारा येथे घटना घडली आहे. मानसिक त्रास झाला तर तो दूर करायला कोणी काय करेल आणि आत्महत्या करेल हे सांगणे कठीण आहे. असाच प्रकार साताऱ्यात घडला असून एका तरुणाने लग्न ठरत नसल्यामुळे स्वतःचे आयुष्य संपवल आहे. यात नितीन शेंडगे असं 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. सातारा येहील वाई तालुक्यातील बदेवाडी गावातील रहिवासी होता. नितीनने सकाळी लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला आहे.
 
नितीन अनेक दिवसांपासून लग्नासाठी मुली पाहात होता. मात्र त्याचं लग्न जुळत नव्हते त्यामुळे तो निराश होता. त्याच नैराश्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेची नोंद भुईज पोलीस ठाण्यात झाली आहे.