मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (13:27 IST)

Patym अलर्ट, ग्राहकांनी लक्ष देऊन वाचा

पेटीएम पेमेंट्स बँकेने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना सुरक्षित राहण्याचे उपाय सांगितले आहे. हे टिप्स डेबिट कार्डाशी निगडित आहे. जर आपण पेटीएम पेमेंट्स बँकेचं डेबिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी कामाची आहे. जाणून घ्या माहिती-
 
डेबिट कार्ड मिळाल्यावर हे काम करा-
पेटीएम पेमेंट्स बँकेने ट्वीट करुन सांगितले आहे की जसेच आपल्याला नवीन डेबिट कार्ड मिळेल सर्वात आधी आपल्याला काय केले पाहिजे. आपल्याला काही टिपा अमलात आणायच्या आहेत ज्याने आपण सुरक्षित राहाल. 
 
ट्रांजेक्शन सेटिंग्समध्ये बदल
पेटीएम पेमेंट्स बँकेनुसार आपलं डेबिट कार्ड मिळाल्यावर मॅनेज कार्ड सेक्शनमध्ये जाऊन कार्ड ट्रांजेक्शन सेटिंग्स बदलावी. याने आपण आपल्या कार्डावर निवडक ट्रांजेक्शन सुरु ठेवू शकता. सोबतच आपण डेबिट कार्ड ट्रांझेक्शन सीमा निर्धारित करु शकता. याने त्या मर्यादेपेक्षा अधिक देण-घेण होणे शक्य नाही.
 
या गोष्टी लक्षात ठेवा
पिन सेट करताना सुनिश्चित करा की बघत नसावे. कार्डाचे‍ पिन कुठेही लिहून ठेवू नये. हे पाठ करुन घ्यावे. अतिरिक्त सुविधा म्हणजे आपण कधीही पेटीएम अॅपद्वारे आपलं पिन बदलू शकता. नवीन कार्ड मिळाल्यावर जुनं कार्ड नष्ट करणे आवश्यक आहे. 
 
शेअर करणे टाळा
महत्त्वाची बाब म्हणजे की ओटीपी, पिन किंवा कार्ड संबंधी कोणतीही माहिती कोणालाही शेअर करु नये. आपल्याला फोन करुन कोणी माहिती विचारल्यास मुळीच सांगू नये. 
 
आपल्यासोबत कोणत्याही गडबडीची आशंका होत असल्यास कार्ड लगेच ब्लॉक करावे. तसेच एटीएमहून पैसे काढताना कोणी आपलं पिन नंबर बघत तर नाहीये याची काळजी घ्या.
 
कोणालाही सोबत घेऊन एटीएम मध्ये जाणे धोक्याचे
आपण एटीएममधून पैसे काढत असताना कोणीही आपल्यासोबत आत नसावं. कोणी बळजबरी आत येण्याचा प्रयत्न करत असल्यास आपण सिक्योरिटी गार्डाला याबद्दल तक्रार करु शकता. पैशे काढल्यावर ट्रांझेक्शन स्लिप नक्की घ्यावी.