गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (15:05 IST)

फोटोशॉप... आता मोबाइलवर!

मुलांनो, 'फोटोशॉप' यासॉफ्टवेअरचा वापर डेस्कटॉपवर केला जातो. या सॉफ्टवेअरमुळे फोटोंना वेगवेगळे इफेक्ट्‌स देता येतात. अगदी साधासा वाटणारा फोटोही फोटोशॉपमुळे वेगळा दिसू लागतो. पण मोबाइलमध्ये काढलेल्या फोटोंचे काय? हे फोटो एडिट करण्यासाठी किंवा त्यांना इफेक्ट देण्यासाठी वेगवेगळी अ‍ॅप्स आहेत. पण फोटोशॉपची कियमाच न्यारी! म्हणूनच 'अ‍ॅडोब'ने फोटोशॉपचं मोबाईल अ‍ॅप तयार केलं आहे. हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर मोबाइलमधल्या फोटोंना भन्नाट इफेक्ट्‌स देता येतील.
 
या अ‍ॅपमध्ये 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. फोटोशॉपच्या अ‍ॅपमुळे यूजर्स नैसर्गिक आणि क्रिएटिव्ह असे दोन्ही प्रकारचे फोटो काढू शकतील. शिवाय एडिट आणि शेअर करण्याची सोयही यात असेल. या अ‍ॅपमध्ये 'अ‍ॅडॉब सेन्सी' बसवण्यात आलं आहे. यामुळे अ‍ॅपला फोटोत नेमकं काय आहे हे अगदी पटकन लक्षात येईल. हे अ‍ॅप यूजरला वेगवेगळ्या सूचनाही देईल. फोटो ढल्यानंतर मूळ फोटो सेव्ह होतो आणि त्याच फोटोच्या प्रतीला निरनिराळे इफेक्ट्‌स दिले जातात. या अ‍ॅपच्या माध्यमातून अ‍ॅडॉबला फोटोशॉप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. फोटोशॉपच्या मोबाइल अ‍ॅपमुळे फोटोंना अगदी झपपट इफेक्ट देणं शक्य होणार आहे.
 चिन्मय प्रभू