1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 17 नोव्हेंबर 2018 (16:02 IST)

रेल्वे सुरक्षा दल मोबाईल अॅप विकसित कणार

railway suraksha dal mobile app
रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) मोबाईल अॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभिनव मोबाईल अॅपमुळे पोलिसांकडून प्रवाशांना हद्दीच्या वादापायी गुन्हा दाखल करण्यात होणारी टाळाटाळ करणे अशक्य होणार असून प्रत्येक गुह्याची वेगाने नोंद होऊन चोरांच्या मुसक्या आवळणे सोपे होणार आहे.
 
चालत्या गाडीत चोरी झाल्याचे लक्षात येईपर्यंत गाडीने बरेच अंतर कापलेले असते. त्यामुळे गुन्हा नोंदविताना हद्दीचा मुद्दा समोर येतो. त्यामुळे नेमके ठिकाण समजेपर्यंत तक्रार नोंदविण्यातच वेळ वाया जातो. त्यामुळे प्रवाशांनी तत्काळ मोबाईल अॅपवरच गुह्याची तक्रार द्यायची अशा प्रकारचे नवीन अॅप विकसित केले जाणार आहे. अशा अॅपचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविला असल्याची माहिती आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली.