1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

माकडांच्या टोळीने केला हल्ला, महिला मृत

agra news
आग्रा- ताज नगरी आग्रा येथे माकडांची दहशत खूपच वाढली आहे. मागील 12 दिवसात एका मुलाला मारण्याच्या घटनेनंतर माकडांच्या एका टोळीने एका महिलेवर हल्ला केला ज्यात 59 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
 
सूत्रांप्रमाणे भूरां देवी नावाच्या वृद्ध महिलेवर शहरातील कागरौल भागात माकडांच्या एका टोळीने हल्ला केला. यामुळे महिलेच्या शरीरावर जखम्या झाल्या होत्या. त्यांना लगेच खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले तरी दुसर्‍यादिवशी त्यांचा मृत्यू झाला.
 
कागरौलचे एसएचओ संजुल पांडे यांच्याप्रमाणे महिलेच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या. त्यांनी सांगितले की याबद्दल लिखित तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. भूरांदेवीच्या पुत्र विजयसिंहप्रमाणे माकडांनी रात्री हल्ला केला होता. नंतर त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले परंतू त्यांचा मृत्यू झाला.
 
इकडे महापौर नवीन यांनी अशा घटनांवर क्रोध प्रकट करत म्हटले की वन विभागाद्वारे दुर्लक्ष केल्यामुळे या प्रकाराच्या घटना वाढत आहे. जिल्हा प्रशासन याबाबत काहीही टिप्पणी करायला तयार नाही.