शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018 (00:06 IST)

फोनचा लॉक पॅटर्न, पिन विसरला...चिंता नको

जर मोबाइलचा पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न लॉकने सुरक्षित केला असेल आणि विसरायला झाल्यास मोबाइल उघडणे कठीण बनते. बर्‍याचदा मजबूत पासवर्ड देण्याच्या नादात कठीण पासवर्ड टाकला जातो आणि नंतर विसरायला होतो. अशी वेळ आल्यानंतर घाबरून जायची काहीही गरज नाही. खाली दिलेल्या स्टेप फॉलो केल्यास तुमचा अनलॉक झालेला फोन एका झटक्यात उघडू शकणार आहे. 
 
स्टेप 1 : स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरवरील ब्राऊजरवर https://myaccount.google.com/find-your-phone-guide  या लिंकवर जावे लागणार आहे. 
 
स्टेप 2 : यानंतर मोबाइलमध्ये असलेल्या गुगल खात्याच्या मेल आयडीद्वारे लॉगइन करावे लागणार आहे. 
 
स्टेप 3 : लॉग इन झाल्यानंतर त्या मेल आयडीशी जोडलेली मोबाइलची यादी दिसेल. यातून तुम्हाला जो फोन अनलॉक करायचा असेल तो निवडावा लागेल.
 
स्टेप 4 : यानंतर दुसर्‍या स्क्रीनवर Lock your phone पर्याय दिसेल. यावर क्लिक करावे. 
 
स्टेप 5 : यानंतर जुन्या विसरलेल्या पासवर्ड, पिन किंवा पॅटर्नच्या बदल्यात नवा पासवर्ड सेट करावा. 
 
स्टेप 6 : पासवर्ड सेट झाल्यानंतर खाली दिलेल्या लॉक बटनावर क्लिक करावे. 
 
स्टेप 7 : यानंतर नवीन पासवर्ड टाकावा. यानंतर स्मार्टफोन अनलॉक होईल.
Ok Google चीही मदत
 
जर तुम्ही गुगल असिस्टंटचा योग्य प्रकारे सेटअप केला असेल तर त्यावेळी Unlock with voice फीचर पाहिले असेल. हे फीचर तुमच्या जुन्या नोंद केलेल्या आवाजाच्या आधारे काम करते. हे फीचर जर चालू असेल तर स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी केवळ Ok Google म्हणावे लागेल.