1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By

टीक - टॉक झाले नंबर वन

2019 मध्ये टीक टॉक ने फेसबुकला मागे टाकत डाऊनलोडिंगमध्ये नंबर वनचे क्रमांक पटकावले आहे. आजच्या काळात जेव्हा स्मार्टफोन आणि इंटरनेट जवळ जवळ सगळ्यांच्या हातापर्यंत पोहोचले असून जगातील भौगोलिक अंतर काही ऍप्समधून जवळीक केले आहे. आजच्या काळात सोशल मीडिया साईट्स आणि ऍप्स ठळकपणे वापरले जाते. त्यामध्ये फेसबुकचे नावं आघाडीवर आहे. ह्या दशकात मोबाईल ऍप्सच्या जगात फेसबुकने वर्चस्व राखले होते. जवळपास 460 कोटींच्या फोनवर फेसबुक सर्रास वापरले जात होते. ह्याच स्पर्धेत फेसबुक मेसेंजर क्रमशः: दुसऱ्या क्रमांकावर होते. पण ह्या वर्षी ह्यांना मागे टाकून टिकटॉक ने प्रथम क्रमांक पटकावले आहे. तसेच ह्या स्पर्धेत व्हाट्सअप हे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 
एप एनी ह्याने 2010 ते 2019 दरम्यान डाउनलोड केलेले ऍप्सच्या डेटांचे विश्लेषण करून हे सिद्ध केले आहे.
 
काही टॉप 10 ऍप्स :- 
नेटफ्लिक्स, टिंडर, पेंडोरा म्युझिक, टेनसेंट वीडियो, लाइन, आईक्यूयी, स्पॉटिफाई, यूट्यूब, एचबीओ नाऊ, क्वाई. ह्या ऍप्समध्ये ग्राहकांनी  करमणुकीला विशेष प्राधान्य दिले असून नंबर दोन वर टिंडर डेटिंग एप आहे. 
 
काही टॉप 10 गेम्स ऍप्स :- 
सब-वे सर्फर, कैंडीक्रश सेगा, टेंपल रन-2, माय टॉकिंग टॉम, क्लेश ऑफ क्लांस, पोऊ, हिल क्लाइंब रेसिंग, मिनियन रश, फ्रूट निंजा, 8 बॉल पूल. हे सर्व गेम्स ऍप आहे. जे लहान आणि मोठे मुलं खेळतात त्या साठी डोक्याच्या वापर करायची गरज नसते.
 
एअरटेलसाठी एक कठीण आव्हान 
 
टेलिकॉम मार्केटमध्ये जिओच्या ब्रॉडबँड योजनेमुळे एअरटेलला कडक स्पर्धा झाली आहे. ह्या पूर्वी एअरटेल ने काही काळापूर्वी हैदराबादमध्ये 799 रुपयांची योजना सुरू केली होती, ज्यामध्ये धारकांना अमर्यादित कॉलची सुविधा दिली होती. आता जिओने एअरटेलला आव्हान देण्यासाठी 699 रुपयांची योजना सुरू केली आहे. ह्यात यूजर्ससाठी एफओपी मर्यादेसह 150 जीबी डेटा देण्यात येत आहे.
 
हैदराबादच्या धारकांसाठी एअरटेलने अतिरिक्त डेटा देण्यासाठी 299 रुपयांच्या पॅकचा पुनर्विचार केला असून त्यात 3.3 जीबीचा डेटा देण्यात आला. त्याचे प्रत्युत्तर म्हणून जिओने 199 रुपयाच्या व्हाऊचरला अपडेट केले आहे.