Tik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
पूर्वी एकदा कोर्टाने बंदी घातलेल्या Tik-Tok विरोधात आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. कसिफ खान यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर मंगळवारी आज 19 नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल.
Tik-Tok ने तर तरुणांना वेड केलें आहे. Tik-Tok च्या व्हिडिओ पाई लोक काहीही करत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्येवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, लोक टेकडीवर, तलावात, समुद्रात अशा धोक्याच्या ठिकाणी जाऊन Tik-Tok व्हिडीओ तयार करत आहेत. मग अपघातात आपला जीव गमावतात. तर काही या Tik-Tok वर व्हिडीओ बनवत आत्महत्या केल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.
कोण जबाबदार आहे या सर्वाना हे मात्र स्पष्ट होत नाही. याची कुणी याची जबदादारी घेत नाही. त्यामुळे यासर्वांसाठी Tik-Tok बनवणाऱ्या कंपनील जबाबदार धरायला हवं, असं याचिकाकर्ते कसिफ खान यांनी सांगितलं.
या Tik-Tok मुळे समाजामध्ये तेढही निर्माण होत आहेत. 153 ए कलमांतर्गत गुन्हे दाखल होत आहेत. याची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होत असते. देशाची बदनामी होत आहे. हा सर्व धोका ओळखूण Tik-Tok बाबत निर्णय घ्यायला हवा, असं याचिकाकर्ते कसिफ खान यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.|||