गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 2 सप्टेंबर 2019 (09:28 IST)

ट्विटरच्या सहसंस्थापकाचे ट्विटर अकाऊंट हॅक

ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी  यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अनेक वर्णभेदी ट्विट  करण्यात आले. Chuckling Squad या ग्रुपने हे अकाऊंट हॅक केल्याचा दावा केला आहे. 
 
रात्री 1 वाजून 35 मिनिटांनी जॅक डॉर्सी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले. त्यानंतर जवळपास 15 मिनीटे त्यांच्या ट्विटरवरुन वर्णभेदी, धमकी आणि जबरदस्ती अशाप्रकारचे ट्विट करण्यात आले. याशिवाय ट्विटरच्या मुख्यालयात बॉम्ब असल्याचे खोटं वृत्त त्यांनी ट्विट केलं. अअशाप्रकारच्या आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्यांनी N हे इंग्रजी लेटर आणि होलोकॉस्ट  टाकले होते. यानंतर काही वेळाने हे आक्षेपार्ह ट्विट डिलीट करण्यात आले.
 
विशेष म्हणजे ट्विटरच्या कम्युनिकेशन टीमने जॅक डॉर्सी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले. आम्ही या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करत आहोत असेही त्यांनी सांगितले.जॅक डॉर्सी यांचे ट्विटरवर 40 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहे. Chuckling Squad या हॅकिंग ग्रुपने आतापर्यंत अभिनेत्यांसह अनेक कलाकारांचे ट्विटर अकाऊंट हॅक केले आहे.