शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

ट्विटरवर एलजीबीटीक्यू गटाशी संबंधित शब्दांना बंदी

ट्विटरने सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा गैरवापर कमी करण्यासाठी, आपल्या धोरणांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले होते. त्याअंतर्गत कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवरील एलजीबीटीक्यू गटाशी संबंधित शब्द उदाहरणार्थ ‘बायसेक्शुअल’सारख्या शब्दांना बंदी घातली. पण या बंदीमुळे ट्विटरवर टीका होत आहे.
 
नव्या धोरणांची अंमलबजावणी करताना मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईटने अॅडल्ट कंटेन्टच्या नियमांतर्गत ‘बायसेक्शुअल’ हॅशटॅगवर बंदी घातली. ट्विटरच्या नव्या धोरणांमधील हा महत्त्वाचा बदल होता.
 
याअंतर्गत आपमानास्पद वागणूक, स्वत:ला त्रास होईल अशी कृती, स्पॅम आणि त्याच्याशी संबंधित व्यवहार, ग्राफिक्स हिंसा आणि अॅडल्ट वस्तूंच्या प्रसारावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून हालचाली सुरु होत्या.