शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जुलै 2019 (14:27 IST)

Jio ला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने आणला 129 रुपयांचा प्लान, मिळेल 2GB डेटा

जिओ (Jio)च्या टेलिकॉम सेक्टरमध्ये आल्यानंतर कंपन्या रोज रोज नवीन रिचार्ज प्लान घेऊन येत आहे. कंपन्या आपल्या जुन्या प्लानमध्ये देखील बदल करत आहे.  टेलिकॉम कंपनी वोडाफोन (Vodafone) ने आपल्या प्रीपेड प्लानमध्ये काही बदल केले आहे.
 
हे बदल केले
वोडाफोन 129 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये कंपनी 2 जीबी डाटा देत आहे. या प्लानची वेलिडीटी 28 दिवसांची आहे. या अगोदर या प्लानमध्ये 1.5 जीबी डेटा मिळत होता. असे मानले जात आहे की कंपनीने हे बदलावं इतर कंपन्यांचे प्लान्स बघून केले आहे. युजर्सला यात फ्री लाइव्ह टीव्ही, मूव्हीज इत्यादी बेनिफिट्स देखील मिळतात.  
 
एयरटेल 129 रुपयांचे प्रीपेड प्लान - एयरटेलच्या या प्लानमध्ये 2जीबी (GB) डाटा आणि 300 एसएमएस (SMS) मिळतात. हा प्लान 28 दिवसांच्या वेलिडिटीसोबत येतो. या प्लानच्या रिचार्जवर अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉलिंगसोबत नॅशनल रोमिंग कॉल्स मिळतात. या प्लानमध्ये एयरटेल टीव्ही सब्सक्रिप्शन आणि फ्री वीक म्युझिक सब्सक्रिप्शन देखील मिळत.
 
रिलायंस जिओ 149 रुपयांचा प्रीपेड प्लान - या प्लानची वेलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्लानमध्ये एकूण 42 जीबी डाटा मिळतो. दररोज 1.5 जीबी डाटा मिळतो.  डाटासोबत, यात अनलिमिटेड वॉयस कॉल्स आणि 100 एसएमएस दररोज मिळतो. 149 रुपयांमध्ये जिओच्या या प्लानमध्ये माय जिओ, जिओ सिनेमा, जिओ न्यूज आणि जिओ क्लाउड ऐप्सची सर्विस मिळते.
 
रिलायंस जियो 98 रुपयांच्या प्रीपेड प्लान - या प्लानमध्ये 2जीबी बंडल्ड डाटासोबत 300 एसएमएस आणि अनलिमिटेड वॉयस कॉल्स मिळते. प्लान 28 दिवसांच्या वेलिडिटीसोबत येतो. यात देखील जिओ ऐप्सची सर्विस मिळते.