1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जुलै 2020 (22:30 IST)

जर 'हे' 7 अॅप्स वापरत असाल तर सावधान!

डेटा लीक (data leak) होण्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. आता एका रिपोर्टमध्ये असे दिसून आले आहे की, VPN सेवा जेवढी सुरक्षित वाटत होती, तेवढी नाही आहे. हाँगकाँगच्या 7 VPN प्रोव्हायडर युझरचा डेटा ऑनलाइन लिक (vpn apps are dangerous) झाला आहे. त्यामुळे जर तुम्ही VPN वापरत असाल तर काळजी घ्या. कारण या 7 VPN अॅँपच्या सुमारे 2 कोटी युझरचा डेटा लिक झाला आहे.
 
या VPN सेवांचा असा दावा आहे की जगभरात त्यांचे 2 कोटी युझर आहेत. रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की, या 2 कोटी युझरचा डेटा एकूण 1.2TB च्या डेटासह ऑनलाइन लीक (vpn apps are dangerous) झाला आहे. जाणून घ्या कोणते आहेत हे 7 VPN अॅप...
UFO VPN
 
FAST VPN
Free VPN
Super VPN
Flash VPN
 Secure VPN
Rabbit VPN
vpnMentorची रिसर्च टीमने तयार केलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हंटले आहे की, VPN सेवा देणारी कंपनी पर्सनली आयडेंटिफायबल इन्फॉर्मेशन (PII) डेटा अॅप्सवरून लीक झाली आहे, तर VPN सेवेची ऑफर देणारी कंपनीने दावा केला आहे की, असा कोणताही डेटा लीक झालेला नाही आहे.
 
यापैकी बर्या च अॅ प्सचा दावा आहे की ते ‘no-log VPNs’ ऑफर करतात, ज्याचा अर्थ असा आहे की ते त्यांच्या नेटवर्कवरील कोणत्याही युझरच्या कामाचे किंवा सर्चचे रेकॉर्ड ठेवू शकत नाही. मात्र हे अॅ प्स गुप्तपणे सर्व माहिती रेकॉर्ड करत असल्याचे आता समोर आले आहे.