शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मे 2018 (09:07 IST)

व्हॉट्सअॅप चॅटसाठी मेसेज उघडण्याची गरज नाही

आता व्हॉट्सअॅप न उघडताही चॅटींग करता येणार आहे. फेसबुकच्या F8 कॉन्फरन्समध्ये व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी नवीन फिचरची माहिती दिली आहे. यामध्ये व्हॉट्सअॅपवर एखादा मेसेज आला की तो स्क्रीनवर दिसतो. या मेसेजला  रिप्लाय करायचा असेल तर  तो उघडण्याची आवश्यकता नाही.  मोबाइल डिस्प्लेवरच रीड आणि रिप्लाय असे दोन पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे काम आणखी सोपे होणार आहे.

नुकतेच व्हॉटसअॅपने आणखी एक फिचर युजर्सच्या भेटीला आणले होते. या नव्या फिचरमुळे तुम्ही एकाचवेळी अनेक जण व्हिडीयो कॉलिंगवर संवाद साधू शकतात.