शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 7 मे 2018 (15:40 IST)

महत्त्वाचे मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी, देशात हायअर्लट जारी

काशी विश्‍वनाथ मंदिरासह भारतातील अन्य महत्त्वाचे मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मथुरामधील मालगोदाम रोडवर जीआरपी बॅरकच्या भींतीवर 4 धमकी देणारं पत्र लावण्यात आले होते. सकाळी एका दूधवाल्याचं लक्ष या पत्रांकडे गेलं. त्यानंतर त्याने याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. यानंतर देशभरात हायअर्लट जारी करण्यात आला आहे.

एका पत्रामध्ये म्हटलं की, 12 मेला काशी विश्‍वनाथ मंदिर, 13 मेला मथुरा, वृंदावन, गोरखपूर आणि अयोध्‍या मंदिर बॉम्बने उडवण्यात येईल. हे पत्र मिळाल्यानंतर काशी विश्‍वनाथ परिसरात रेड झोनमध्ये पोलीस, पीएसी आणि सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणा यावर नजर ठेवून आहेत. ललिता घाट येथील पशुपतीनाथ मंदिराची सुरक्षा देखील वाढण्यात आली आहे. लोकांना देखील संदिग्‍ध व्‍यक्तींवर नजर ठेवण्याचं पोलिसांनी आवाहन केलं आहे.