मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लंडन , सोमवार, 7 मे 2018 (11:23 IST)

असा दिसतो प्रिंस लुईस, शाही ताजचा पाचवा उत्तराधिकारी (बघा फोटो)

ब्रिटनच्या शाही परिवाराने नवजात शिशू प्रिंस लुईसचे दोन फोटो प्रसिद्ध केले आहे. हे फोटो त्यांची आई केटने आपल्या केंसिंगटन पॅलेसहून घेतले आहे.  
 
या फोटोमध्ये तीन वर्षीय राजकुमारी शार्लेट झोपत असलेल्या आपल्या भावाचे चुंबन घेत आहे. तसेच दुसर्‍या फोटोत तो झोपताना दिसत आहे.  
 
केंसिंगटन पॅलेसने एका बयानात म्हटले आहे की, 'ड्यूक आणि डचेज ऑफ केंब्रिज राजकुमारी शार्लेट आणि प्रिंस लुईस यांचे दोन फोटो प्रसिद्ध करण्याबद्दल फारच खूश आहे.'
राजकुमारी शार्लेटसोबत घेतलेले हे फोटो दोन मे चे आहे जेव्हाकी दुसरे फोटो त्याच्या जन्मानंतरच्या तीन दिवसानंतरचे अर्थात 26 एप्रिलचे आहे.  
 
लुईस आर्थर चार्ल्स ब्रिटिश शाही ताजचे पाचवे उत्तराधिकारी असतील आणि ते विलियम आणि केट यांची तिसरी संतानं आहे. लुईस महाराणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती प्रिंस फिलिप यांने सहाव्या पिढीतील नातू आहे