शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑगस्ट 2020 (10:45 IST)

WhatsAppने आणले नवीन फीचर

व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) दररोज अनेक मेसेज फॉरवर्ड केले जातात. यामधील काही मेसेज खरे असतात तर काही फेक. मात्र हे माहित करून घेणे कठीण असते. खरा-खोट्याची ओळख करणे अनेकांसाठी कठीण असते. अनेकदा खात्री न करून घेताच मेसेज फॉरवर्ड केले जातात. या समस्येचं निरसन करण्यासाठी WhatsApp ने नवीन फीचर आणले आहे. या फीचरमधून तुम्हाला फॉरवर्ड मेसेजची सत्यता पडताळून पाहता येईल. हे फीचर अद्याप भारतात उपलब्ध करण्यात आलेले नाही. मात्र लवकरच हे फीचर देखील भारतीय युजर्ससाठी जारी केले जाणार आहे.
 
असे तपासू शकाल फेक मेसेज
WhatsApp ने त्यांच्या ब्लॉगमध्ये असे म्हटले आहे की, या  फीचरच्या माध्यमातून अगदी सहजपणे तपासता येईल की युजरकडे आलेला मेसेज खरा आहे की खोटा. WhatsApp च्या या खास फीचरच्या माध्यमातून युजर फॉरवर्ड केलेल्या मेसेजजवळ असणाऱ्या मॅग्निफाइंग ग्लास आयकॉनवर टॅप करून ब्राउजरवर जाऊ शकतील, ज्याठिकाणी हा मेसेज अपलोड करण्यात आला आहे.
 
यानंतर युजर वेब रिझल्टच्या माध्यमातून मेसेजची सत्यता जाणून घेऊ शकतील. त्याचप्रमाणे मेसेजच्या पडताळणीसाठी युजर्सना असे आर्टिकल्स देखील मिळतील, ज्यामध्ये फॉरवर्ड केलेले मेसेज फेक किंवा रिअल असण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली असेल.
 
WhatsApp चे हे फीचर सध्या ब्राझिल, इटली, आयर्लंड, मेक्सिको, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिका याठिकाणी लाँच करण्यात आले आहे. हे फीचर लवकरच भारतात येण्याची देखील शक्यता आहे. हे फीचर अँड्रॉइड, आयओएस (iOS) त्याचप्रमाणे Whatsapp वेबसाठी देखील देण्यात आले आहे. यासाठी युजर्सना WhatsApp लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करावे लागेल.