शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 21 ऑगस्ट 2018 (08:52 IST)

व्हॉट्सऍप लवकरच युझर्सचा डेटा डिलीट करणार

व्हॉट्सऍप लवकरच युझर्सचा डेटा डिलीट करणार आहे. व्हॉट्सऍपचा डेटा नोव्हेंबर महिन्यापासून व्हॉट्सऍपऐवजी गुगल ड्राइव्हमध्ये स्टोअर करण्यात येईल. त्यामुळे आतापर्यंतचा डेटा हवा असल्यास वेळीच बॅकअप घ्यावा लागेल. व्हॉट्सऍप आणि गुगलमध्ये करार झाला आहे. त्यानुसार हा बदल करण्यात येणार आहे. आता व्हॉट्सऍप आपल्या युझर्सचा डेटा साफ  करणार आहे. युझर्सना आपल्या अकाऊंटमधील डेटा गुगल ड्राइव्हमध्ये साठवू देण्यास गुगलने मान्यता दिली आहे. त्यासाठी गुगल ड्राईव्हची 15 जीबी मोफत स्पेस वापरली जाणार नाही, तर अतिरिक्त जागेत हा डेटा स्टोअर करण्यात येईल.
 
येत्या नोव्हेंबरनंतर चॅट, फोटो, व्हिडीयो आणि ऑडियोचा बॅकअप गुगल ड्राइव्हमध्ये घेतला जाईल. त्यासाठी 12 नोव्हेंबरपर्यंत युझर्सना डेटाचा बॅकअप घ्यावा लागेल. तसे केले नाही तर सर्व डेटा डिलीट होईल.