1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 4 जानेवारी 2020 (13:24 IST)

व्हॉट्सअॅपवर मेसेजचा महापूरच, 24 तासांत 100 अब्ज मेसेज

नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देण्याची पद्धत बदलली आहे. याचा प्रभाव सरळ व्हॉट्सअॅपवर दिसून येत आहे. या वर्षी मात्र, नवीन वर्षाच्या निमित्ताने व्हॉट्सअॅपवर मेसेजचा महापूरच आला. जगभरात व्हॉट्सअॅपवर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे सुमारे 100 अब्ज मेसेज पाठवण्यात आले.
 
31 डिसेंबरच्या संध्याकाळापसून ते मध्यरात्रीपर्यंत अशा 24 तासांच्या काळात जवळपास 100 अब्ज मेसेज जगभरात पाठवण्यात आले होते. फक्त भारतातच 31 डिसेंबर रोजी युजर्सने 20 अब्जाहून अधिक मेसेज व्हॉट्सअॅपवर पाठवले आहेत.
 
व्हॉट्सअॅपने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात पाठवण्यात आलेल्या 100 अब्ज मेसेजमध्ये 12 अब्ज फक्त फोटो असलेल्या शुभेच्छा होत्या. हे मेसेज नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे असतील असं व्हॉट्सअॅपने म्हटले आहे.