शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 19 जुलै 2017 (15:12 IST)

Whats App मध्ये बघू शकाल यूट्यूब व्हिडिओ

व्हाट्सएपचे यूजर्स लवकरच अॅपमध्ये यूट्यूब व्हिडिओ बघू शकतील. मीडिया रिपोर्टप्रमाणे व्हाट्सएपमध्ये एक नवीन फीचर दिसून आला आहे ज्याच्या माध्यमाने उपभोक्ता अॅपमध्येच कुठल्याही यूट्यूब व्हिडिओचे लिंकला सुरू करू शकतील. व्हिडिओला पिक्चर-इन-पिक्चर या पूर्ण स्क्रीनवर बघता येईल. सध्या व्हाट्सएप इन-एप यूट्यूब व्हिडिओला प्लेबॅक करण्याची संधी देत आही.  
 
‘डब्ल्यूएबीटाइन्फो’ने व्हाट्सएपच्या आयओएस बीटा एपच्या 2.17.40 संस्करणावर एक नवीन फीचर बघितला. चर्चा अशी आहे की व्हाट्सएप आयओएस एपमध्ये नवीन यूट्यूब प्लेबॅक फीचरचे परीक्षण करत आहे. नवीन फीचरसोबत व्हाट्सऐपवर एखाद्या चॅटमध्ये पाठवलेल्या यूट्यूब लिंकला त्याच चॅट विंडोमध्ये सुरू करणे शक्य असेल. याचा अर्थ असा आहे की आता  यूट्यूब एपमध्ये लिंक उघडण्याची गरज भासणार नाही. व्हाट्सऐप उपभोक्ता विंडोला रिसाईज करू शकतील. एक वेगळ्या पूर्ण  स्क्रीनवर देखील व्हिडिओ उघडण्याची सुविधा असेल. जर उपभोक्ता त्याच चॅट विंडोमध्ये दुसरे मेसेज बघायची इच्छा बाळगून असतील तर स्क्रीनला साइड करू शकतात.  
 
व्हाट्सएप उपभोक्ता द्वारे एखादे दुसरे चॅट किंवा ऐपमध्ये स्विच केल्यावर यूट्यूब व्हिडिओचे प्रदर्शन थांबून जाईल. हे फीचर आयफोन 6च्या वरच्या सर्व वेरिएंटचे समर्थन करेल. सध्या हा नवीन फीचर आयओएस व्हाट्सएप बीटा यूजरसाठीच उपलब्ध आहे.  
 
अशी उमेद आहे की हे फीचर सामान्य आयओएस उपभोक्तासाठी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेद आहे की जर हे नवीन फीचर परीक्षणात यशस्वी झाले तर हे लवकरच सर्व उपभोक्त्यांसाठी उपलब्ध करण्यात येईल. सध्या व्हाट्सएपमध्ये एखादे यूट्यूब लिंक आल्यावर त्याला एपहून बाहेर जाऊन बघावे लागते. नवीन फीचरमुळे उपभोक्ता एपमध्येच यूट्यूब व्हिडिओ लिंकला सुरू करून बघू शकतील.