शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 23 नोव्हेंबर 2015 (11:29 IST)

आता ऑफलाईनही करू शकता व्हॉट्सअँप रिप्लाय

सोशल मीडियामध्ये आघाडीवर असलेले व्हॉट्सअँप आपल्या यूजर्ससाठी नेहमीच नवेनवे फीचर्स आणत असते. नुकतेच व्हॉट्सअँपने आपल्या यूजर्ससाठी असेच काहीसे वेगळे आणि नवीन फीचर आणले आहे. याआधी तुम्हाला केवळ ऑनलाईन असतानाच व्हॉट्सअँपवरील मेसेजेस उत्तर देता येत होते. मात्र आता ऑनलाईन न दिसताही तुम्ही मेसेजेस रिप्लाय देऊ शकता. 
 
‘क्विक रिप्लाय’ हा नवा पर्याय व्हॉट्सअँपने आणलाय. यात तुम्ही नोटिफिकेशनवरील मेसेजेस तात्काळ उत्तर देऊ शकता, तेही ऑनलाईन न दिसता. तसेच जेव्हा तुम्ही व्हॉट्सअँप पाहिला होता तेव्हाचाच लास्ट सीन समोरच्या व्यक्तीला दिसेल. त्यामुळे आवश्यक रिप्लायही देता येईल आणि समोरच्या व्यक्तीला आपण ऑनलाईन आहोत हेही दिसणार नाही.

उदाहरणार्थ, तुमच्या मित्राचा तुम्हाला व्हॉट्सअँप मेसेज आलाय आणि तुम्ही त्याला क्विक रिप्लायने उत्तर दिले तर तुम्ही त्याला व्हॉट्सअँपवर मेसेज करूनही ऑनलाईन दिसणार नाही. तसेच तुमचा लास्ट सीनही बदलणार नाही. सध्या हे फीचर्स केवळ आयओएस यूजर्ससाठी उपलब्ध आहे.