शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

एअरटेलकडून 1 GB 4 G डेटा फ्री

रिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर मोठी स्पर्धा निर्माण झालेली दिसते. यातून प्रत्येक कंपनी ग्राहकांना आपलेसे करण्यासाठी नवनवीन ऑफर देत आहे. आता एअरटेलने खास प्रीपेड ग्राहकांसाठी 1 GB 4 G इंटरनेट डेटा ऑफर नुकतीच लाँच केली आहे. या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना ही सुविधा मोफत मिळणार आहे.

ही ऑफर फक्त 4 G प्रीपेड सिम असणाऱया मात्र 3 G इंटरनेट सेवा वापरणाऱया ग्राहकांसाठीच आहे. या सेवेचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांनी आपल्या 4 G सिमवरुन 52122 या क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर संबंधित ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेसह ही डेटा ऑफर उपलब्ध होणार आहे.

या सेवेचा लाभ महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कोलकाता, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांतील ग्राहकांना मिळणार आहे.