शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 14 ऑक्टोबर 2014 (12:44 IST)

ऑनलाईन शॉपिंगचे खास ऑफर्स

स्नॅपडील आणि फ्लिपकार्ट देणारऑनलाईन शॉपिंग वेबसाइट स्नॅपडीलने 0-१२ वर्षांच्या मुलांचा विचार करून एसडी किड्स नावाचा प्रोग्रॅम लाँच केला आहे. आईवडील स्नॅपडीलवर आपल्या मुलांचे रजिस्ट्रेशन करतात, तर त्यांना मुलांसाठी आकर्षक ऑफर मिळेल. 
 
स्नॅपडीलच्या ऑफिसच्या मते या सेवेला सुरू करण्याचा उद्देश म्हणजे लहान मुलांना चांगल्या ऑफर्स आणि प्रमोशनबद्दल माहिती देणे हा आहे. प्रोग्रॅममध्ये प्रत्येक लहान मुलाच्या वयाच्या कॅटेगिरीनुसार ऑफर्स दिल्या गेल्या आहेत. आता त्यांच्यात फक्त खेळणी उपलब्ध आहे. मात्र काही वेळानंतर यामध्ये अन्य उत्पादनासंदर्भात ही माहिती दिली जाईल. फ्लिपकार्टने विद्यार्थ्यांसाठी एक खास स्क्रीम सुरू केली आहे. ज्यामुळे फ्लिपकार्ट वेळोवेळी वेगवेगळय़ा कॅ टेगिरीजनुसार ऑफर्स देईल. या ऑफर्ससाठी विद्यार्थ्यांना आपले ओळखपत्र व त्यासोबत फोटो आणि स्वत: संबंधातील माहिती फ्लिपकार्टला ई-मेल करावी लागेल. ओळखपत्राची चौकशी झाल्यावर ३ दिवसांनंतर स्कीम लागू केली जाईल. त्या संदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना मेल किंवा एसएमएसद्वारे दिली जाईल. त्यानंतर विद्यार्थी ७५0 रुपयांच्या शॉपिंगवर १५0 रुपयांची डिस्कांऊट मिळवू शकतो. त्याचसोबत फ्लिपकार्ट फस्र्ट प्रीमियर सर्व्हिसवर विद्यार्थ्यांना ५0 टक्के ऑफर मिळू शकेल. अँड्राइड अँप्सवर अमर उजाला नावाच्या वेबसाईटवर अधिक माहिती वाचू शकता किंवा फेसबुकद्वारेही अमर उजालाच्या न्यूज वाचू शकता.