शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 30 जानेवारी 2016 (00:02 IST)

खुशखबर ! फेसबुक आणि व्हॉटस्अँप होणार एकमेकांशी कनेक्ट

फेसबुक आणि व्हॉटस्अँप युजर्सची संख्या जगात मोठी आहे. आज व्हॉटस्अँपमुळे फेसबुकवर चॅट करणं जरा कमीच झाले आहे. तरीही फेसबुकवर जाणार्‍यांची संख्या ही अजूनही जास्त आहे. पण दोघंही तुम्हाला एकत्र पाहायला मिळणार आहे. 
 
फेसबुककडेच व्हॉटस्अँपची मालकी असल्याने आता फेसबुक आणि व्हॉटस्अँप एकमेकांना जोडले जाणार आहेत. व्हॉटस्अँप अकाऊंटला फेसबुक अकाऊंटशी जोडण्याचं काम मोठय़ा जोराने सुरू आहे. 
 
या कामामुळेच आज काही वेळ व्हॉटस्अँप डाऊन होतं. व्हॉटस्अँप अकाऊंट फेसबुकशी कनेक्ट झाल्यानंतर व्हॉटस्अँपवरील स्क्रीनशॉटस्, व्हिडिओ, फोटो इत्यादी थेट तुम्ही फेसबुकवर शेअर करू शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला वेगळं अँप्लिकेशन ओपन करण्याची गरज पडणार नाही. 
 
अँड्रॉईड डेव्हलपर जेवियर सँटॉसने एक व्हॉटस्अँप स्क्रीन शॉट शेर केला आहे, ज्याङ्कध्ये या नव्या फीचर्सची एक झलक तुम्हाला पाहायला मिळेल.