शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 2 सप्टेंबर 2015 (14:16 IST)

गूगलच्या नवीन लोगोमध्ये काय खास आहे जाणून घ्या...

लोकप्रिय सर्च इंजन गूगलने व्यावसायिक स्तरावर मोठे बदल करून मंगळवारी आपला नवीन लोगो जारी केला आहे.  
 
नवीन लोगोमध्ये गूगलच्या अक्षरांचे रंग आधीसारखेच ठेवण्यात आले आहे, पण त्याच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आले आहे. गूगल शब्दावर क्लिक केल्यावर तो चार वेगळ्या रंगांमध्ये दिसतो.  
 
गूगलच्या नवीन प्रतीक चिह्नासाठी जो डूडल तयार करण्यात आला आहे त्यावर क्लिक करताच जुने प्रतीक चिह्नाला मिटवत एक हात दिसतो. त्याचबरोबर एक नवीन लोगो दिसून येतो आणि नंतर गूगलचा पहिला अक्षर जी चार वेगळ्या रंगांमध्ये चक्राकार फिरताना दिसतो.
 
वर्ष 1998 मध्ये गूगलच्या सुरुवातीनंतर कंपनीने आपला 'लोगो' पाचवेळा बदलला आहे. कंपनीनुसार इंटरनेटच्या सर्च पानावर गूगलचा नवीन प्रतीक चिह्न कालपासून दिसून येत आहे. लवकरच हा कंपनीच्या इतर उत्पादनांवर दिसेल. 

कंपनीचे असे मानणे आहे की लोकांमध्ये लोकप्रियता कायम ठेवण्यासाठी असल्या प्रकारचे बदल करणे गरजेचे आहे.