शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : सोमवार, 15 जून 2015 (16:23 IST)

ग्राहकाकडूनच फ्लिपकार्टची लबाडी उघड

ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट शानदार सेल आणि दमदार ऑफर्ससाठी ओळखल्या जातात. फ्लिपकार्ट ही त्यापैकीच एक वेबसाईट. 
 
मात्र डिस्काउंट देण्याच्या नावावर फ्लिपकार्ट ग्राहकांना फसवत असल्याचा आरोप केला जात आहे. एका प्रोडक्टवर दिलेल्या एका ऑफरबाबत फ्लिपकार्ट वेबसाईट संशयाच्या भोवर्‍यात अडकली आहे. 
 
कोलकातामध्ये राहणारे मणिशंकर सेन यांनी फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मुलींच्या सॅण्डलची 50 टक्के डिस्काउंटसह 399 रुपयांमध्ये विक्री केली जात आहे. फ्लिपकार्टने याची किंमत 799 सांगितली होती. मात्र फोटो झूम केल्यानंतर असं कळलं की, या सॅण्डलची खरी किंमत 399 रुपयेच आहे. त्यामुळे डिस्काउंटच्या नावावर ही फसवणूक असल्याचं स्पष्ट होतं. 
 
या पोस्टमध्ये मणिशंकर यांनी लिहिलं आहे की, डियर फ्लिपकार्ट टीम, आम्ही ऑनलाइन शॉपिंगबद्दल विचार करतो तेव्हा पहिल्यांदा तुमची साईट अवश्य चेक करतो. तुम्ही भारतीय बाजारात मोठी ब्रॅण्ड व्हॅल्यू निर्माण केली आहे. पण अशा प्रकारच्या घटनांमुळे तुमच्यावरील विश्वासाबरोबरच ब्रॅण्ड व्हॅल्यूही घटत आहे.