शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

चॅट एप्स चालविण्यासाठी इंटरनेटची गरज नाही

मोबाईलमध्ये असलेल्या व्हॉटसअप, फेसबुक मॅसेंजर, हाईक, टेलेग्राम, वी चॅट, बीबीएम, यांसारखे चॅट अॅप्स चालविण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. कारण खास यासाठी चॅट सीमकार्ड उपलब्ध झाले आहेत. फोनमध्ये चॅट सिमकार्ड टाकले की ही सर्व संदेशांचे देवाणघेवाण करणारी एप्स मोफत सुरू करता येतात. त्यामुळे कितीही बोलता येते, फोटो, व्हिडिओ, फाईल्सची देवाणघेवाण करता येते. भारतासह १५० देशांमध्ये हे कार्ड चालते. सध्या अमेझॉनसारख्या संकेतस्थळावर चॅट सिमकार्ड सुमारे २ हजारांत उपलब्ध आहे. यात वर्षभर हे कार्ड वापरता येते. पुन्हा रिचार्ज करायचे असेल तर वर्षभरासाठी साधारण ९०० रुपयांचा खर्च सध्या येत आहे.