शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जून 2014 (12:53 IST)

ट्विटरचे दोन तासांत 2 लाख 86 हजार फॉलोअर्स

अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएनेही फेसबुक आणि ट्विटरवर आपले खाते उघडले आहे. सोशल मीडियावर येताच या पेजेसला नेटिझन्सच्या प्रचंड लाइक्स मिळाल्या. ट्विटर अकाउंटला तर केवळ नऊ तासांत 2 लाख 68 हजारांहून अधिक फॉलोअर्स मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. सीआयए अर्थात सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी फेसबुक, ट्विटरवर येताच त्याला मोठय़ा प्रमाणात पसंती मिळाली आहे. ट्विटरवर सीआयएच्या पेजला नऊ तासांतच 2 लाख 86 हजार फॉलोअर्स झाले आहेत. पहिले ट्विट 1 लाख 70 हजार जणांना रिट्विट करण्यात आले तर 9 लाख जणांनी ते फेव्हरेट म्हणून नोंदवले आहे.

सीआयएचे फेसबुकवरही जोरदार स्वागत करण्यात आले आहे. सीआयएच्या फेसबुक पेजला एका दिवसांत 7 हजार 300 लाइक्स मिळाल्या आहेत. नागरिकांशी संपर्क साधता यावा म्हणून सोशल नेटवर्किग साइट जॉइन करण्याचा निर्णय घेतला आहे. सीआयएच्या विविध मोहिमांमध्ये काही घडामोडी जाणून घेण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. या पेजवर सीआयए बद्दलही वेगवेगळी माहिती अपलोड करण्यात येणार आहे, असे सीआयएचे प्रमुख जॉन ब्रेनान म्हणाले.